राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा चाळीसगाव येथील समृध्दी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सतीश साहेबराव सूर्यवंशी यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार डॉ.एन.एम. काबरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. महेंद्र काबरा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवनात प्रदान करण्यात आला.
पिंपरखेड तांडा येथील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेत सतीश सूर्यवंशी हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून ते विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना कृतीशील अध्यापन करणारे उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या उपक्रमाचे ‘सेल्फी विथ सक्सेस’ हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झाले. हे पुस्तक संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा संदीपा वाघ, संचालक ज्ञानेश्वर वाघ यांना पुरस्काराच्या आयोजित कार्यक्रमात सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. त्यांनी केलेल्या शिक्षण, साहित्य व सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराबद्दल सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सतीश सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले. त्यांना प्राचार्य बी.पी. पाटील, प्राचार्य एस.एस. राठोड, मुख्याध्यापिका मीनाताई बागुल, पर्यवेक्षक सी.डी. पाटील यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत असते.