राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्काराने सतीष पाटील सन्मानित

0
12

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील रणाईचे येथील रहिवासी तथा सध्या गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त अति संवेदनशील व अतिदुर्गम असलेल्या ठिकाणी केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस उपनिरीक्षक सतीष वामन पाटील यांना १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

गेल्या २ वर्षांपासून सतीष पाटील हे विशेष अभियान पथक (C ६०), गडचिरोली येथे कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अति संवेदनशील व दुर्गम असल्याने त्याठिकाणी C ६० कडून सतत नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येते. त्यादरम्यान झालेल्या नक्षल चकमकी दरम्यान केलेले उत्कृष्ट पथक नेतृत्व व केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सतीष पाटील यांना गडचिरोली पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीस दलासाठी सर्वोच्च व मानाचे समजले जाणारे राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांच्यावर अनेकांची कौतुकाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here