साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी जळगाव संचालित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय हरित सेनेमार्फत सर्पमित्र विवेक देसाई यांनी विषारी, बिनविषारी साप, त्यांच्या प्रजाती, सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार यांची विस्तृत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक निकम, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला आशिष पाटील, सुनील तायडे यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम ज्येष्ठ शिक्षक एस.डी भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सापांविषयी असणारे समज, गैरसमज दूर केले. तसेच त्यांच्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तरे देऊन शंकेचे निरसन करण्यात आले.