साईमत जळगाव प्रतिनिधी
सरस्वती विद्या मंदिर येथे १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ पितृ दिवस म्हणून साजरा करण्यात आला. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा न करता विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच योग्य ते संस्कार घडावे योग्य संदेश जावा यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले. पालकांनी देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. पालक आणि विद्यार्थी देखील भारावून गेले. ज्योती पतंगे, दूसाने ताई, कविता चौधरी, अनिता पाटील ,गोरख बाविस्कर, शुभम दुसाने, वैष्णवी पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रभारी मुख्याध्यापिका नीलिमा भारंबे, सुदर्शन पाटील ,वैशाली बाविस्कर दिपाली जगताप , सीमा जोशी अनिता शिरसाठ यांचे सहकार्य लाभले.तर प्रोत्साहन संस्थाध्यक्ष मनोजकुमार पाटील, संचालिका प्रतीक्षा पाटील यांचे लाभले.