‘Trees, My Grandfather’ initiative : झाड माझ्या दादांचं’ उपक्रम अंतर्गत महाविद्यालयांना रोप भेट

0
20

रोप भेट देण्यासाठी अश्विन सुरवाडे यांनी घेतला पुढाकार

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी/:

‘झाड माझ्या दादांचं’ या उपक्रमांतर्गत विविध झाडांचे वृक्षारोपण व्हावे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन व जतन व्हावे या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभेचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्विन सुरवाडे यांच्या पुढाकाराने मुक्ताईनगर शहरातील वरिष्ठ महाविद्यालयांना भेट म्हणून रोपे देण्यात आले.

जैवविविधतेचा विचार करुन झाडे लावून हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात यावे तसेच दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नातून वृक्षारोपण करणे या उद्देशाने मुक्ताईनगर शहरातील जी.जी. खडसे महाविद्यालय, शासकीय कृषी महाविद्यालय, संत मुक्ताबाई महाविद्यालय येथील प्राचार्य यांना रोप भेट म्हणून देण्यात आले.

यात सर्वसाधारणपणे आवळा, कडू निंब,चिंच, वड यासारख्या औषधी व इतर रोपं वितरित करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी,पर्यावरण रक्षणासाठी, वृक्षारोपणासाठी .अश्विन सुरवाडे यांनी पुढाकार घेतला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी जी. जी. खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन , शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.संदीप पाटील ,जीशान बागवान,प्रवीण राठोड, विश्वजीत देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here