Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»तिर्थक्षेत्री मुक्ताईनगरला संत मुक्ताई जन्मोत्सव उत्साहात साजरा
    मुक्ताईनगर

    तिर्थक्षेत्री मुक्ताईनगरला संत मुक्ताई जन्मोत्सव उत्साहात साजरा

    saimatBy saimatOctober 4, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    oppo_2
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तिर्थक्षेत्री मुक्ताईनगरला संत मुक्ताई जन्मोत्सव उत्साहात साजरा

    साईमत/मुक्ताईनगर /प्रतिनिधी :

    संत ज्ञानेश्वर आधी चौघा भावंडांमध्ये अतिशय लडिवाळ असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत, आपल्या परखड अभंग वाणीतून थोर कवयित्री म्हणून ओळख असणाऱ्या मुक्ताबाई यांचा अश्विन मासातील नवरात्रोत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना शुभदिनी अवतीर्ण झाल्याने मुक्ताई साहेबांचा हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निश्चय करून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तापी पूर्णा परिसर सेवेकरांतर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई चंडी सेवा अंतर्गत सामूहिक दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन केले होते.

    सामूहिक पारायण सोहळ्यात हजारो सेवेकरी तसेच संत मुक्ताई फळावरील वारकरी ताडकळी फडकरी कीर्तनकार मंडळी सहभागी झाले होते. दुर्गा सप्तशती पाठांतर आदिशक्ती मुक्ताई चरित्र गाथेतून त्यांच्या जन्मोत्सवाचा अध्याय वाचून आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात पुष्पवृष्टी करून संत मुक्ताई जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.तत्पूर्वी पहाटे रवींद्र पाटील यांच्या हस्ते आई मुक्ताईस महापूजा अभिषेक आरती करण्यात आली.

    यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, संत मुक्ताई संस्थान विश्वस्त सम्राट पाटील, आ.चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील, निवृत्ती पाटील, व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे, पुरुषोत्तम वंजारी, दुर्गाताई मराठे, संतोष मराठे यांच्यासह हजारो महिला व पुरुष सेवेकरी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार

    March 31, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.