माझ्यामागे संजय राऊतांचा ब्रॅण्ड, मला १०० कोटींची ऑफर ः सुनील राऊत

0
20

मुंबई ः प्रतिनिधी

शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता भाजपा ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे राहिलेल्या नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरून संजय राऊत आणि त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मलाही १०० कोटींची ऑफर असल्याचा दावा सुनिल राऊतांनी केला आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओत त्यांनी असे म्हटले आहे.

“संजय राऊतांनीही विचार केला असता, भाजपासमोर गुडघे टेकले असते तर ते साडेचार महिने तुरुंगात गेले नसते. मंत्री झाले असते. पण संजय राऊत डमगमला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची निष्ठा होती. पक्षासाठी, संघटनेसाठी त्यांनी जे केलं त्यापेक्षाही जास्त माझ्या घरच्यांनी केले”, असे सुनील राऊत म्हणाले.

“मला आजही १०० कोटींची ऑफर आहे. मी आमदार आहेच, पण माझ्या मागे माझा ब्रॅण्ड संजय राऊत असल्याने मला १०० कोटींची ऑफर आहे”, असा दावाही सुनील राऊतांनी केला आहे.“१०० कोटी रुपये घेऊन मला शिवसेना मिळणार आहे का? निष्ठा मला मिळणार आहे का? माझ्यासाठी काम करणारे शिवसैनिक मिळणार आहेत का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here