थाईबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तरोडातील संजना हिवरकरला सुवर्णपदक

0
24

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

नेपाळ येथील बॅकोट स्टेडीयम, काठमांडू येथे फर्स्ट साउथ एशियन थाईबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यात सात देशांमधील सुमारे २५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत भारताने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय संघातर्फे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी आणि सद्यस्थितीत ठाणे येथील विद्यालयातील विद्यार्थिनी संजना गजानन हिवरकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले आहे. स्पर्धेत पिंपरी चिंचवड येथील खेळाडूंनी १५ सुवर्णपदक, १ रौप्यपदक तर १ कांस्यपदक पटकावले. नेपाळच्या संघाने स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त केले. विजयी खेळाडूंची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली आहे.

स्पर्धेतील सुवर्णपदकाची मानकरी संजना गजानन हिवरकर ही सेंट लॉरेन्स हायस्कुल, ठाणेची विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकांकडून व परिसरातून संजनाचे कौतुक होत आहे. याबद्दल नेपाळ बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष लांबा, राष्ट्रीय थायबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष पी. वाय. आत्तार यांनी कौतुक केले आहे. स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंची निवड थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थाईबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here