जीपीएसच्या प्रांगणात सांग सांग भोलानाथची धमाल

0
13

साईमत लाईव्ह पाळधी ता धरणगाव प्रतिनिधी

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी बळीराजाचं वैभव असणाऱ्या बैलांचा पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतामध्ये वर्षभर राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याचा परममित्र म्हणजे त्याचा लाडका बैल, आणि या नंदीबैलाचा अनोखा सोहळा म्हणजे पोळा, त्या सणाचं अनोखा साजरीकरण भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी करण्यात आले. मातीच्या बैलांसोबतच खऱ्याखुऱ्या बैल जोडीला शाळेत आणून त्यांची पूजा करण्यात आली, विद्यार्थ्यांना शेतकरी, बैल, बैलपोळा या विषयी माहिती सांगण्यात आली, गुंजन गोपाल पाटील या विद्यार्थिनीचे पालक श्री गोपाल पाटील यांनी आपली मानाची बैल जोडी शाळेत पाठवली, खऱ्याखुऱ्या बैल जोडीला विद्यार्थ्यांसाठी घेऊन येणाऱ्या भूमिपुत्राचा शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

भूतदया हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजाव म्हणून प्राचार्य श्री सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने अतिशय उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला. आणि लाडक्या बैलांसाठी हॅपी बर्थडे टू यू हे बालगोपालांनी गायलेलं गाणं विशेष आकर्षणाचा भाग ठरले.

सदर कार्यक्रमाला युवासम्राट माननीय श्री प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील, भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री सचिन पाटील सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here