साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या आदेशानुसार जामनेर सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप हिवाळे यांची फेरनिवड केली आहे. तसेच युवक तालुकाध्यक्षपदी रुपेश पाटील यांची नव्याने निवड करण्यात आली.
यावेळी माजी जि.प.सदस्य संजय गरूड, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, सामाजिक न्यायचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, विश्वजित पाटील, राहुल इंगळे, दिलीप सोनवणे, विशाल माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी कौतुक केले आहे.