साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :
संजय राऊत (Sanjay Raut) यांना आम्ही महत्त्व देत नाही. ते केवळ फिल्मी डायलॉग मारतात. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून आमचाच विजय होईल, संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी आहे, असा विश्वास कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी व्यक्त केला. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना (Shivsena) असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी केला.
सोमवारी सकाळी शिंदे समर्थकांनी पुन्हा ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले. टेंभीनाका परिसरात शिंदे समर्थकांनी मोठी गर्दी केली. संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यात. शिंदे समर्थक आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर गेलेत. शिंदे म्हणालेत की, आम्ही शक्तिप्रदर्शन करत नसून केवळ आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. आमची शिवसेना वेगळी नाही. ती बाळासाहेबांच्या विचारांवर हिंदुत्वावर चालते. त्या शिवसेनेत आम्ही आहोत.
बंडखोर ४० आमदारांचा आत्मा मेला असून त्यांचे मृतदेह परत येतील, या राऊत यांच्या टीकेचाही शिंदे यांनी समाचार घेतला. राऊत यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांच्या बाेलण्याने काहीही फरक पडणार नाही. आम्ही शांंत आहाेत, असे ते म्हणालेत.
