
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला १० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ‘एक बार फिर से मोदी सरकार’ असा नारा देत रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर शहर येथे भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह खा.रक्षा खडसे यांनी विजय महाजन, रवींद्र राणे, अविनाश महाजन, निलेश शिरसाठ, मुकेश महल्ले, किशोर बोडदे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन ‘संपर्क से समर्थन’ आणि ‘घर चलो अभियान’ राबविले.
‘मोदी सरकार’मार्फत जनसामान्यांपासून तर विविध क्षेत्रात केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला. तसेच माहिती पत्रकाचेही वाटप करण्यात आले. तसेच जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येऊन मोदी सरकारच्या कामकाजाविषयी वैयक्तिक अनुभव जाणून घेण्यात आले. ‘महाविजय २०२४’ साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
यावेळी खा.रक्षा खडसे यांच्यासह ललित महाजन, नजमा तडवी, शहराध्यक्ष पंकज कोळी, सचिन पाटील, सचिन बोरोले, भाजयुमोचे तालुका सरचिटणीस मयूर महाजन, राहील खान आदी उपस्थित होते.


