खूप मोठे व्हा अन् समाजाची सेवा करा : कवी आर. डी. कोळी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती तसेच समाज चिंतामणी प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे संस्थापक तथा कवी आर. डी. कोळी यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त जळगावातील बाल निरीक्षण गृहात अभिनव अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बाल निरीक्षण गृहातील ६० अनाथ मुला-मुलींना अल्पोपहार, केक, पेढे वाटप करण्यात आले.
समाजाने माझ्यासाठी काय केले, त्यापेक्षा मला समाजासाठी काय करता येईल, असा विचार प्रत्येक भारतीय नागरिकाने केला पाहिजे. खूप मोठे व्हा आणि समाजाची सेवा करा. ‘समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा कवी आर. डी. कोळी यांनी केले.
गरजुंनाही केले अल्पोपहाराचे वाटप
बाल निरीक्षण गृहातील कार्यक्रमानंतर रेल्वे स्टेशन, चिमुकले राम मंदिर, हनुमान मंदिर आदी परिसरातील गरजुंनाही अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बाल निरीक्षणगृहाचे उप अधीक्षक डिगंबर पाटील, गौतम सोनवणे, समाज चिंतामणी प्रतिष्ठानच्या सचिव शालिनी सैंदाणे, लक्ष्मीबाई सोनवणे आदी उपस्थित होते.