सारांश फाउंडेशनतर्फे वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्यांचा ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव

0
70

गौरवार्थींच्या चांगल्या कार्याची नोंद घेत मान्यवरांनी केले कौतुक

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उत्तमरित्या कार्यरत डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्त्यांच्या चांगल्या कार्याची नोंद घेत त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देण्यासाठी सारांश फाउंडेशनतर्फे रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयात समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा आयएमए असोसिएशनच्या सचिव डॉ. अनिता भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, जळगाव महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यासह सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगळे यांची उपस्थिती होती.

यांचा होता गौरवार्थींमध्ये समावेश

वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी सत्कारार्थी डॉ.लीना पाटील, डॉ.कोमल सरोदे, डॉ.मोना बोरोले, डॉ.वृषाली पाटील, डॉ.कविता आडिया, डॉ.आनंद दशपुत्रे, डॉ. विकास पाटील, डॉ.उमेश वानखेडे, डॉ.सुषमा चौधरी, आर.एल.हॉस्पिटल, डॉ.अनिल शिरसाळे, डॉ.दीपक चौधरी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी निवेदिता ताठे, कविता झाल्टे, वैशाली पाटील, माजी नगरसेविका पार्वता भील, शुभांगी बिऱ्हाडे, कुसुमताई फाउंडेशन, सिद्धिविनायक पार्क महिला मंडळ यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी सारांश फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष इंदू मोरे, सचिव चंदा इंगळे, विद्या झनके, रंजना मोरे, संगीता पगारे, संजय इंगळे, आशा खैरनार, संगीता मोरे, पूजा इंगळे, अजय इंगळे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक निलू इंगळे, सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे तर आभार सोनली पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here