योगदानाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना मिळाला उजाळा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जळगाव कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी लेवा भवनातील सरदार पटेल यांच्या अर्धकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सरदार पटेल यांच्या कार्याचा व देशाच्या एकीकरणातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमास फाउंडेशनचे सचिव राहुल नेतलेकर, योगेश बागडे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, पंकज गागडे, राहुल दहियेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे व्यक्त करण्यात आला.



