गांधीजींचे विचार अन् त्यांचा जीवन प्रवासावर झाले मार्गदर्शन
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मेंटल, मोरल आणि सोशियल सायन्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे उपस्थित होते.
प्रमुख वक्ते प्रा. वंदना नेमाडे यांनी गांधीजींचे विचार आणि त्यांचा जीवन प्रवासावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी महात्मा गांधीजींनी केलेले चंपारण्य सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ इत्यादी बाबतीत सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील यांनी महात्मा गांधीजींचे तत्व सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यावरती प्रकाश टाकुन त्यांच्या विचारांची प्रासंगिता विशद केली.
यशस्वीतेसाठी मेंटल, मोरल आणि सोशल सायन्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. साहेबराव राठोड, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. संगीता भिरूड आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले तर सूत्रसंचालन संध्या वराडे यांनी केले.