उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्ही.डी.नेहेते, विजय चौधरी यांनी प्रतिमांचे पूजन केले.
यावेळी पी.डी.नेहेते यांनी लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या महान कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यालयातील विद्यार्थी गीतांजली पाटील, निधी मौर्य, धनश्री सावंत, मोहिनी देवकर, बळीराम सुळे यांनी भाषणे दिली. यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मानसी पाटील तर आभार समीक्षा चौधरी यांनी मानले.