चाळीसगाव महाविद्यालयातर्फे संत गाडगेबाबा, संत रोहिदास महाराज यांना अभिवादन

0
40

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस्‌, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज येथे संत गाडगेबाबा आणि संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद व्ही. बिल्दीकर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, उपप्राचार्य डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. के.एस. खापर्डे, प्रा. ए. आर. मगर, उत्सव समिती प्रमुख प्रा.अंकुश जाधव, प्रा. नयना पाटील, प्रा. दीपक पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. बिल्दीकर यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करून संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण समाजास दिलेला स्वच्छतेचा मंत्र तसेच त्यांनी त्यांचे विचार, संस्कृती आणि त्यांच्या कार्याविषयी प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांनी संत रोहिदास महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करून संत रोहिदास महाराज यांचे समता, बंधुता, स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात विचार मांडले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी हेमंत गायकवाड, संजय जाधव यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा आभार उत्सव समिती प्रमुख प्रा. अंकुश जाधव आणि प्रा.के.डी.पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here