माजी आ.अप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

0
19

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

‘खान्देशचा ढाण्या वाघ’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले पाचोरा तालुक्याचे सहकार, शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी माजी आमदार स्व.अप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांना बुधवारी, १८ ऑक्टोबर रोजी स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शक्तीस्थळाला माजी आमदार दिलीप वाघ, पी.टी.सी.चे चेअरमन संजय वाघ, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती दगाजी वाघ, मधुकर वाघ यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी खलील देशमुख यांनी स्व.ओंकार वाघ यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पी.टी.सी.चे व्हा. चेअरमन व्ही.टी. जोशी, पं.स.चे गटनेते ललित वाघ, नगरसेवक भूषण वाघ, नितीन तावडे, खलील देशमुख, विनायक जकातदार, श्याम भोसले, नाना देवरे, प्रकाश पाटील, सुनील पाटील, जगदीश सोनार, मधुकर पाटील, प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, प्राचार्य विश्वासराव साळुंखे, प्रा.भागवत महालपुरे, वासुदेव महाजन, अशोक मोरे, आकाश वाघ, विजय पाटील, सरपंच बुऱ्हान तडवी, उपसरपंच प्रदीप वाघ, शशिकांत वाघ, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, प्रकाश भोसले, रणजित पाटील, अजय अहिरे, पितांबर कोतवाल, प्रेमराज शेवगे, सुभाष शिंदे, अली पेंटर, गुलाब तडवी, अली मेवाती, जगदीश वाघ, पिंटू दारकोंडे, भाऊसाहेब पाटील, सदाशिव नरवाडे, नामदेव पाटील, सुभाष शिंदे, सुभाष शिर्के, राजेंद्र सोनार, रवींद्र पाटील, राजु गावंडे, गोदाराम बडगुजर, भगवान डांबरे, मुख्याध्यापक सुधीर पाटील, प्राचार्य डी. व्ही. पाटील, पर्यवेक्षक जी. एन. पाटील तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here