साईमत लाईव्ह साकेगाव प्रतिनिधी
ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे यांच्या माध्यमातून गुरांच्या आरोग्याचे आरोग्याचे शिबिर संपन्न झाले.साकेगाव गावात नुकतेच लंपी या गुरांच्या आजाराने थैमान घातले होते. यासाठी गुरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी एक पत्रक काढले होते. या पत्रकाच्या अनुषंगाने ग्रा.प.सदस्य सचिन सपकाळे,शकील पटेल व ग्रामस्थ संतोष पाटील व ग्रामविकास अधिकारी शिरतुरे यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून गावात 500 गुरांना 13 ऑगस्ट रोजी व्हॅक्सिन लस मारण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी गावातील पशु मालकांनी गुरांच्या आरोग्यासाठी आपल्या गुरांवर वॅक्सिंग मारून घेतल्या, त्यामुळे गुरांच्या आजाराचे प्रमाण कमी झाले असून तसेच ज्यांची गुरे या आजारांने त्रस्त आहेत, अशांसाठी लवकरच पुन्हा कार्यक्रम घेणार असल्याचे सचिन सपकाळे यांनी साईमत वार्ताहराशी बोलतांना सांगितले.शिबिरासाठी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी सचिन तायडे व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.