पिंपळगाव कमानीला संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी मंदिराच्या सभामंडपाचे भुमीपूजन

0
31

साईमत, पहूर, ता.जामनेर : वार्ताहर

येथून जवळील पिंपळगाव कमानी (तांडा) येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज आणि माता जगदंबा देवीच्या मंदिरावर सभामंडपचे भुमीपूजन माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक रतन चव्हाण, शेंदुर्णीचे संजय गरुड यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या आमदार निधीतून सभामंडपाचे काम मंजूर झाले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, माजी जि.प.सदस्य अमित देशमुख, सरपंच प्रियंका चव्हाण, उपसरपंच- संदीप राठोड, पोलीस पाटील तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष इंदल चव्हाण, संचालक प्रल्हाद चव्हाण, माजी सरपंच अर्जुन राठोड, शेषमल राठोड, रामदेव बाबा मंदिराचे पुजारी मदन महाराज, सरपंच पती रामेश्‍वर चव्हाण, पहुर पेठचे माजी सरपंच रामेश्‍वर पाटील, पिंपळगाव बु.चे सरपंच ज्ञानेश्‍वर पाटील, ग्रा.पं.सदस्य कैलास चव्हाण तसेच रामेश्‍वर चव्हाण, लाला राठोड, गोकुळ राठोड, राजू चव्हाण यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here