संत मुक्ताई चर्मकार मठाचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
22

साईमत/ न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर :

आदिशक्ती संत मुक्ताई समाधीस्थळ कोथळी परिसरात संत मुक्ताईच्या मंदिराचे हेमांडपंथी जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या पुरातन चर्मकार मठाला आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून चर्मकार समाजाच्या वारकरी मठाला जागा मिळून येथे आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याने ३० लाखांचे भव्य असे सभागृह बांधकाम पूर्ण झाले. संत मुक्ताई चर्मकार मठ ट्रस्ट कोथळीला आ.पाटील यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

याठिकाणी संत रोहिदास महाराजांची मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा तसेच संत मुक्ताई चरित्र व संत रोहिदास महाराज चरित्र पारायण सोहळ्याचे गेल्या २३ जूनपासून आयोजन केले होते. भागवत कथा ॲड. कैलास महाराज यांच्या सुश्राव्य वणीतून तर संत मुक्ताई चरित्र वाचन ह.भ. प. मीराताई महाराज शिंगायत, संत रोहिदास महाराज चरित्र वाचन ह.भ. प. पुंडलिक महाराज किनगावकर यांच्या मधुर वाणीतून झाले. तसेच कैलास महाराज यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसादाने रविवारी, ३० जून २०२४ रोजी लोकार्पण सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाची सांगता झाली.

यांची होती उपस्थिती

यावेळी आ.चंद्रकांत पाटील, यामिनी पाटील, शिवसेना रावेर लोकसभा महिला आघाडी संपर्कप्रमुख संजना पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख छोटू भोई, शिवराज पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, किर्तनकार ह.भ. प. दुर्गा संतोष मराठे, संत मुक्ताबाई चर्मकार मठ ट्रस्ट, कोथळीचे अध्यक्ष ह.भ.प. एकनाथ शेकोकार, जामनेरचे उपाध्यक्ष ह.भ.प. पंडीत निंभोरे महाराज, विश्वस्त (ट्रस्टी) ह.भ.प. संजय निंभोरे, ह.भ.प. अॅड. कैलास महाराज, बऱ्हाणपूरचे ह.भ.प. पुंडलिक महाराज तायडे, किनगाव, ह.भ.प. कांतिलाल वानखेडे, आसोदा, ह.भ.प. प्रकाश रोझतकर, ह.भ.प. पंढरी सावकारे, जळगाव, ह.भ.प. श्रीमती सिंधुबाई सुरळकर, जामनेर, ह.भ.प. सुनंदाताई घुले, मुक्ताईनगर, ह.भ.प. रामदास वानखेडे, ह.भ.प. आत्माराम सावकारे, ह.भ.प.गलू ठोसरे, भादली, कडू घुले, कैलास शिर्के, निलेश घुले, भागवत शिर्के, संजय निंभोरे, गणेश निंभोरे उपस्थित होते . सूत्रसंचालन संजय निंभोरे तर ह.भ.प. एकनाथ शेकोकार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here