अर्धा किलो चांदीची बक्षिसे वाटप, विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला, श्रीगणेशाच्या चित्रांतून खुलली बालप्रतिभा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गणेशोत्सवानिमित्त दै. ‘साईमत’ वृत्तपत्राने जळगावातील नामांकित शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा व कलात्मक उपक्रम राबविला. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अपूर्ण गणेशाचे पेन्सिल स्केच देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकता आणि कलेच्या जोरावर ती चित्रे पूर्ण करायची होती. अशा अनोख्या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील विविध शाळांमधून शेकडो आकर्षक व सुंदर कलाकृती प्राप्त झाल्या. त्यापैकी उत्तम कलाकृतींची निवड करून प्रत्येक वर्गातील दोन विजेते ठरविण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना पाच ग्रॅम वजनाची शुद्ध चांदीची नाणी देण्यात आली. या नाण्यांवर गणपतीची मोहक प्रतिमा कोरलेली आहे. ती विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची अमूल्य आठवण ठरली. उपक्रमातून अर्धा किलो चांदी वाटप करण्यात आली. उपक्रमाच्या यशात जळगावातील विविध शाळांच्या प्राचार्यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा गौरव केला. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून रोहित किशोर शिंपी लाभले. तसेच पारितोषिक वितरण सोहळ्यांमध्ये जळगावचे सुप्रसिद्ध रील स्टार निखिल इंगळे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
विवेकानंद प्रतिष्ठान सेमी इंग्लिश मिडीयम स्कुल
प्राचार्य हेमराज पाटील यांच्या उपस्थितीत श्रीधावर डी. बडगुजर, किर्ती निलेश दंडगव्हाळ, अर्पिता एच. चौधरी, वेदिका डी. प्याई, गणेश विनोद कासर, यथार्थ तुकाराम गवळी, वेदांत गोपाल मराठे, किर्तिका राजू थंकार, प्राची मनोज इंगळे, मनस्वी योगेश पाटील, किमया जितेंद्र पाटील, आदर्श गजानन माळी यांचा गौरव झाला.
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल
प्राचार्य संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत जयस्वी योगेश पवार, श्रुती वैभव सवदेकर, लावण्या श्रवण मिस्तरी, नित्याश्री स्वप्नील भोकरे, समीक्षा विनोद माळी, विधी राजेश सोनवणे, सोहम नाईक, वेदांत दागर, आदित्य कुलकर्णी, ओम श्रवण मिस्तरी, संकेत सचिन दौंड, रमा विवेक पुंडे यांनी चमक दाखवली.
काशिनाथ पलोड पब्लिक स्कुल
प्राचार्य प्रवीण सोनवणे यांच्या उपस्थितीत राधा धिरज जोशी, तनिष्का सोन्याबापू धांडे, आरव शेषराव तोरे, पुनर्वी गणेश पाटील, आयुषी पंकज भारंबे, आद्न्या प्रवीण चौधरी, सारा निलेश अजनादकर, पंखुडी एस. जैन, कनिका सुनील भामरे, अर्णव व्ही. ओझा, सन्निता कुलकर्णी, आदित्य दीपक बडगुजर, अदिती पानसे, सार्थक शंकर बनायत यांचा गौरव करण्यात आला.
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कुल
प्राचार्या श्रद्धा दुनाखे यांच्या उपस्थितीत भाविका निशिकांत देपुरा, ईशा राजू निकूम, तनमय पलाश जगताप, विपस्सी विजय सोनवणे, कृष्णा दिनेश राणा, सर्वेश वैद्य, जय जी. तांबट, पाटील भाग्यश्री महेंद्रसिंह, जयदीप एस. निरशे यांनी यश संपादन केले.
उज्ज्वल स्कुल
प्राचार्या मानसी गगधानी यांच्या उपस्थितीत रुखसादा खरे, अवनीश बारी, दिया मंधान, पुनीत डी. येवले, मयूर वांखेडे, आर्यन भालेराव यांनी चमक दाखवली.
आर.आर. शाळा, न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल
दुर्वा रमेश चौधरी, प्राची वुनाल पाटील, दिव्यानी चेतन पाटील, दिव्या देविदास कोळी, नेहा दिलीप पाटील, पूर्वा राजीव तायडे, दीपक प्रजापत, लोकेश संदीप बिडके, वैष्णवी शांताराम शिंदे, आदित्य अरुण सुतार, वैभवी राकेश भांगळे, ध्रुव राजेंद्र वाणी, स्वामिनी अमित अडवडकर, खुशबू उमेश पाटील, मोहित निलेश कोल्हे यांनी स्पर्धेत प्राविण्य मिळवले.
प्रगती विद्या मंदिर स्कुल
चेअरमन प्रेमचंद ओसवाल, प्राचार्या संगीता गोहिल यांच्या उपस्थितीत ऋषिकेश तुषार भारंबे, साम्यक मनोज तायडे, दुर्वेश गायकवाड, विशाल शिरसदकर, देवश्री धनराज सोनार, निशांत रवींद्र पाटील, ललित प्रवीण विसपुते, श्रीराज अमोल देवरे, विशाखा चव्हाण, आशु शेळके, निशांत कांतिलाल पाटील, दर्शन पंकज सोनवणे यांनी यश संपादन केले.
किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल
प्राचार्या मिनल जैन, समन्वयक मालिन साळवी यांच्या उपस्थितीत रेवांशी, प्रियांश राजपूत, राजलक्ष्मी पाटील, विवेक मक्रेजा, नमन मंगलानी, समर्था पाटील, अपूर्वा गजकुश, आदित्य गायकवाड, हिमांश भुंबरे, भक्ती लड्ढा, प्रवर नाहर, उर्जा जैन, प्राप्टी कुक्रेजा, हितिका भंसाली, किमाया कावडिया, प्रिशा काबरा यांचा सत्कार करण्यात आला.
अशा स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ कलागुणांचा विकास नाही तर गणेशोत्सव अधिक प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरल्याचा सूर विद्यार्थ्यांमधून उमटला.