शिवसेना शिंदे गटाच्या चाळीसगाव शहरप्रमुखपदी सागर चौधरी

0
25

पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे फळ मिळाल्याने लागली वर्णी

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नेते उमेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते चाळीसगाव शहर प्रमुखपदी सागर रावण चौधरी यांची नुकतीच नियुक्ती केली आहे.

सागर चौधरी हे शिवसेना पक्षाचे २०१४ पासून ते आजपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. तसेच स्व.पप्पूदादा गुंजाळ यांचे खंदे समर्थक म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून तालुक्यात शिवसेना पक्ष बांधणीसाठी मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे फळ शिवसेना शिंदे गट जळगाव जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी सागर चौधरी यांची शहरप्रमुख पदावर वर्णी लागली आहे.

जळगाव जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, चाळीसगाव तालुका प्रमुख राहुल पाटील, शुभम राठोड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष आणि जिल्हाप्रमुखांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलवून त्यांचा विश्वास नक्कीच सार्थकी लावील.त्याचबरोबर पक्ष वाढीबरोबरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या माध्यमातून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया सागर चौधरी यांनी निवडीनंतर दिली. तसेच त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here