बोदवड ः प्रतिनिधी
तालुक्यातील नाडगाव ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकलेला दिसून येत आहे. श्रीमती अश्विनी नरेंंद्र कुरपाडे या शिवसेना शिंदे गटाच्या महिला सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर श्रीमती कविता श्रीकृष्ण लासुलकर यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते.त्यामुळे पुन्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यामध्ये महिला राज पुन्हा ग्रामपंचायतीवर आले असल्याचे निदर्शनास येत आहे.
महिला सक्षमीकरण तसेच महिला विकास होण्यासाठी महिलांना सक्षम होण्याची गरज दिसून येत आहे त्याच पावलावर पाऊल टाकत अश्विनी कृपाळे यांची सरपंच म्हणून निवड झाल्याने गावातील सर्वस्तरातून त्यांंचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
सामाजिक संघटना तसेच राजकीय संघटनांनी पाठबळ दिल्याने तसेच पाठिंंबा दर्शवल्याने त्या आज महिला सरपंच म्हणून काम करण्यास सक्षम आहे.राष्ट्रीय विकलांग पार्टीचे प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड,उपसरपंच गणेश पाटील, ग्रामपंंचायत सदस्य सुभाष इंगळे,विजय गायकवाड,योगिता लसुनकर,माधुरी गवळे,पुनम धांंडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.