पारंपरिक उत्सव साजरा करत नागरिकांनी मानले देवतेचे आभार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
नवरात्रीचा उत्सव संपताच गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून देवीची विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. शहरातील नागरिक, घरगुती मंडळ तसेच सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग दाखवला.सायंकाळी मेहरुण तलाव परिसरात शहरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी देवीच्या भव्य मूर्तींचे विसर्जन शांततेत पार पाडले. यावेळी मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस, उत्सव समितीच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
विसर्जन सोहळ्यावेळी लोकांनी जल्लोष केला. फटाक्यांच्या प्रकाशात मूर्तींचे विसर्जन झाल्याने परिसर अधिक उजळला. नागरिकांनी पारंपरिक उत्सव साजरा करत देवतेचे आभार मानले. यावेळी उपस्थित मंडळांचे पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन विसर्जन सोहळा यशस्वी केला. अशा उत्सवामुळे शहरातील नवरात्री सणाची सांगता पारंपरिक पद्धतीने झाली. तसेच नागरिकांनी धार्मिक विधी, उत्सवातील आनंद आणि शांतता यांचा उत्तम समन्वय राखल्याचे विसर्जन सोहळ्यात दिसून आले.