येवती ग्रुप ग्रा.पं.च्या सरपंचपदी साधना धामोडे

0
119

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

तालुक्यातील येवती-रेवती ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रवक्ता प्रमोद धामोडे यांच्या पत्नी साधना प्रमोद धामोडे यांची लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली आहे. येवती ग्रामपंचायत येथे प्रशासक पंडित ठाकरे आणि ग्रामसेवक गणेश घुले यांच्या समक्ष सर्वानुमते ईश्‍वर चिठ्ठीद्वारे शुभम गणेशराव पाटील यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

शुभम पाटील उच्चशिक्षित असून ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व येवती गावाला उपसरपंच म्हणून लाभले आहे. त्यामुळे गावातील शैक्षणिक, आरोग्य व सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

यावेळी डॉ.आनंद माळी, योगेश माळी, भागवत पाटील, जितु ट्रेलर, दत्तु धनगर, भागवत धनगर, डिगंबर माळी, शांताराम वाघ, कृष्णा वाघ, आबा ठाकुर, ज्ञानेश्‍वर विसाळे, ग्रा.पं.सदस्य हर्षदा वानखेडे, दुर्गा माळी, पठाण गुलाब, कविता शेजोळे, म्हसाणे संगम दीपक, केसरबाई भील, आशिष सोनवणे, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here