साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील तांबोळे खु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना रयत सेनेच्यावतीने रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार यांच्या हस्ते नुकतेच वह्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून रयत सेनेच्यावतीने प्रत्येकवर्षी गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय साहित्य वाटपामुळे गरजु विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे समाधान वाटते.
चाळीसगाव येथील पवारवाडी विठ्ठल रुख्मिणी मंदिरात स्वामी विवेकानंद शाळेच्या १०० विद्यार्थ्यांना शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मेहुणबारे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. रयत सेनेने ग्रामीण भागात येऊन जि.प.शाळेच्या गरजु विद्यार्थ्यांना वही वाटप केल्याबद्दल रयत सेनेचे शिक्षका सीमा देशमुख यांनी आभार मानले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला दीपक (भैय्या) राजपूत, तांबोळे रयत सेना शाखेचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष भगवान पाटील, अनिल पाटील, सचिन बोरसे, कैलास पाटील, अनिल पाटील, नानासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रवीण पाटील, शिवाजी पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, समाधान पाटील, भगवान पाटील यांच्यासह तांबोळे रयत सेना शाखेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.