साईमत जळगाव प्रतिनिधी
आर आर विद्यालयात आज मराठी नववर्ष गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले. शालेय मैदानात मोठी गुढी उभारण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी मराठी गीतांच्या ‘स्वररंग’ कार्यक्रमाद्वारे नवीन वर्षाचे स्वागत केले.
सकाळी विभागाचे जेष्ठ शिक्षक सौ. प्रतिमा याज्ञीक, श्री. एस. आर. पिले, श्री. टी. बी. पांढरे व सौ. एस. एम. देवराज यांच्या शुभहस्ते गुढीची पूजा संपन्न झाली. या विधीचे पौराहित्य श्री. द्वारकाधीश जोशी यांनी पार पाडले. कार्यक्रमात श्री. रामचंद्र पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना गुढीपाडव्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व समजावून सांगितले, तर विद्यार्थ्यांनी मंत्र व प्रार्थना उच्चारली.
चित्रकला विभागाच्या वतीने गुढी व परिसर सजावटीचे काम अरुण सपकाळे, के. डी. शेलकर व वाय. बी. न्हासदे यांनी केले, तर रांगोळी समितीच्या वतीने एल. पी. तायडे, आर. जे. लांबोळे, एस. ए. साळी, एम. पी. बऱ्हाटे व आर. एन. भदाणे यांनी सजावटीत हातभार लावला.
विद्यार्थ्यांसह श्री. संजय क्षीरसागर यांनी प्रार्थना आणि गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. व्ही. एस. रोकडे यांनी केले. सुमारे 300 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन नववर्ष स्वागताचे आनंदोत्सव रंगवले. विद्यार्थ्यांनी मराठी नववर्षाच्या विविध गीतांना तालासुरात सादर केले आणि आनंदी वातावरण निर्माण केले.
यानंतर, श्री. जे. जी. पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लेझीमच्या विविध प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन केले, जे उपस्थितांचे कौतुकास पात्र ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली, ज्यामुळे हा उत्सव विद्यालयासाठी अविस्मरणीय ठरला.
