Royal Enfield च्या ‘या’ बाइक्समध्ये होऊ शकते शॉर्ट सर्किट, परत मागवल्या लाखो गाड्या

0
4

 देशातील सर्वात लोकप्रिय ऑटोमोबाइल कंपनी पैकी एक असलेल्या रॉयल एनफिल्डने आपल्या काही मॉडेल्सला परत मागवले आहे. काही बाइक्समध्ये वापरलेल्या पार्ट्सपैकी एकात त्रुटी आढळली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, बाइकच्या इग्निशन कॉइलमधून मिसफायरिंग होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बाइकच्या परफॉर्मेंसवर परिणाम होईल. तसेच, काहींमध्ये या त्रुटीमुळे शॉर्ट सर्किट होण्याची देखील शक्यता आहे.

या त्रुटीमुळे रॉयल एनफिल्डने Bullet ३५०, Classic ३५० आणि काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Meteor ३५० बाइकच्या २,३६,९६६ यूनिट्सला परत मागवले आहे. कंपनीने स्वतःहून या गाड्या परत मागवल्या आहेत. यात डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ मध्ये निर्मिती झालेल्या गाड्यांचा समावेश आहे. कंपनीने डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ मध्ये तयार झालेल्या Meteor ३५० ला परत मागवले आहे. तर जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ मध्ये तयार झालेल्या Bullet ३५० व Classic ३५० या बाइक्सला रिकॉल केले आहे.

रॉयल एनफिल्डने म्हटले आहे की, या रिकॉलचा परिणाम डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान

थायलंड, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या या मॉडेल्सच्या विक्रीवर देखील होईल.

कंपनीने पुढे म्हटले आहे की, ही दुर्मिळ गोष्ट असून, या कालावधीत बनलेल्या सर्वच बाइक्सवर याचा परिणाम झालेला नाही. कंपनीचा अंदाज आहे की परत मागवलेल्या बाइक्सपैकी १० टक्क्यांपेक्षा कमीमध्ये इग्निशन कॉइलला बदलावे लागेल. ज्या ग्राहकांच्या बाइक्स यात येतात त्यांना कंपनीची सर्व्हिस टीम आणि डीलरशीप कॉल करण्यास सुरूवात करणार आहे.

परत मागवण्यात आलेल्या बाइक्सची तपासणी केली जाईल व गरज पडल्यास खराब पार्टला बदलले जाईल, असेही कंपनीने सांगितले. दुसरीकडे ग्राहक देखील डिलरशीपला कॉल करू शकतात व व्हीकल आयडेंटिफिकेशन नंबरची माहिती देऊन, यात त्यांच्या बाइकचा समावेश आहे का नाही, याची माहिती करून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here