चाळीसगावला लोकसभा निवडणुकीनिमित्त पोलिसांतर्फे रुट मार्च

0
80

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेरून आलेले केरळचे पोलीस आणि चाळीसगाव शहर पोस्ट यांनी रूट मार्च केला. ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते ११.३० या कालावधीत चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्चचे आयोजन केले होते.

रूट मार्चमध्ये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी, ३४ अंमलदार तसेच राज्य राखीव पोलीस दल, केरळ यांचे दोन अधिकारी, ५० सहकारी उपस्थित होते. रूट मार्चमध्ये घाट रोड, चौधरी वाडा प्रभात गल्ली, नागद रोड, रांजणगाव दरवाजा, सराफ बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, भडगाव रोड, गणेश रोड हा परिसर समाविष्ट करण्यात केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here