वर्ल्डकपसाठी रोहितसेना ठरली ; १५ खेळाडूंच्या टीमची घोषणा

0
13

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी

बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे.येत्या ५ ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी १५ जणांच्या स्क्वॉडची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला जात असल्याने टीम इंडिया जिंकण्यासाठी प्रबळ दाव्ोदार मानली जात आहे. याव्ोळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे.

रोहित शर्मा कर्णधारपदी
टीम इंडिया प्रबळ दाव्ोदार म्हणून वर्ल्डकपमध्ये उतरणार आहे. ओपनर रोहित शर्माकडे टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएल राहुल आणि इशान किशन यांचा विकेटकीपर म्हणून टीममध्ये समाव्ोश करण्यात आला आहे.याशिवाय नुकतीच सर्जरी झालेल्या केएल राहुललाही संघात स्थान मिळाले आहे.

अश्विन आणि चहलला वगळले
भारताचा अनुभवी स्पिनर युझवेंद्र चहलचे वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. गेल्या वर्ल्डकपमध्येही चहलला टीममध्ये संधी देण्यात आली नव्हती. चहलसोबत आर अश्विनला देखील वर्ल्डकपच्या टीमचा भाग बनवण्यात आलेले नाही. उत्तम स्पिनर म्हणून अश्विनचे नाव घेतले जाते मात्र वर्ल्डकपसाठी त्याच्या नावाचा विचार केलेला नाही.

अजूनही टीममध्ये बदल करणे शक्य
दरम्यान टीम इंडिया अजूनही टीममध्ये बदल करू शकते. वर्ल्डकपसाठी ज्या देशांना टीम स्क्वॉडमध्ये बदल करायचा असेल तो देश २८ सप्टेंबरपर्यंत आयसीसीच्या परवानगीशिवाय बदल करू शकतात. मात्र २८ सप्टेंबरपर्यंत त्याला अंतिम १५ सदस्यीय टीम घोषित करावी लागणार आहे. यानंतर आयसीसीच्या मंजुरीनंतरच बदल करता येतील.

वर्ल्डकपसाठीची टीम
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली,जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन,सूर्यकुमार यादव,कुलदीप यादव,मोहम्मद. सिराज, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.

१४ ऑक्टोबरला रंगणार
भारत-पाकिस्तान सामना
भारत एकट्या देशाने वनडे वर्ल्डकप आयोजित करण्याची ही पहिलीच व्ोळ आहे. यापूर्वी १९८७, १९९६ आणि २०११ वर्ल्डकपचे संयुक्तपणे आयोजन केले होते. टीम इंडिया ८ ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कप २०२३ सिझनमधील पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध हा सामना असून चेन्नईच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.भारत-पाकिस्तान हे संघ १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांसमोर लढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here