नाथाभाऊ यांनी मुहूर्तमेढ रोवलेली बोदवड उपसा सिंचन योजना रोहिणी ताईंनी पूर्ण करावी. :- पुरुषोत्तम पाटील

0
21

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी

वराड; येथे जनसंवाद यात्रेत शेतकरी संघटनेचे बोदवड तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले रोहिणी खडसे यांनी सुरू केलेली जनसंवाद यात्रा कौतुकास्पद आहे.

त्या माजी मंत्री व तीस वर्षे आमदार असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या कन्या आहेत, अशा मोठया नेत्यांची मुले परदेशात किंवा उद्योग धंद्यात स्थायिक होतात किंवा स्वतः संघर्ष न करता वडिलांच्या पुण्याई ने राजकारण येतात परंतु रोहिणी ताई याला अपवाद आहेत. नाथाभाऊ सारख्या मोठ्या व्यक्तीच्या त्या कन्या असुन सुद्धा त्या राजकारण सक्रिय झाल्या आहेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत.
त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत आगामी काळात हीच जनता रोहिणी ताईंच्या पाठीशी उभी राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

तसेच बोदवड तालुक्याचा मुख्य प्रश्न हा शेतीचे पाणी आहे त्यासाठी नाथाभाऊ यांनी बोदवड उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली आहे रोहिणी खडसे या ती योजना पूर्णत्वास नेण्यास प्रयत्न करतील व पूर्णत्वास नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here