Rohan Ghuge District Collector : जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार रोहन घुगे यांनी स्वीकारला

0
13

माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकला बदली

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

जळगाव जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या रोहन घुगे (भाप्रसे) यांनी गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते जिल्हा परिषद ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाले आहे. ‘कार्यालयीन मूल्यमापन – १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

दरम्यान, माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे झाली आहे. त्यांच्या जागी शासन आदेशान्वये रोहन घुगे यांची नियुक्ती केली आहे. पदभार स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here