जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नॅशनल हायवे क्रमांक ६ या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन कोंडी होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात होत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत काही ठिकाणचे खड्डे बुजविले. मात्र, खड्डे मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांची अडचण झाली. त्यामुळे तत्काळ खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र तसेच जळगाव जागा यात्रा आणि निवेदन देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा सादर केलेला आहे. त्यानुसार तात्पुरती उपाययोजना म्हणून काही ठिकाणी खडी, मुरूम टाकण्यात आला आहे. मात्र, अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी केले आहे.
आयुक्तालयांतर्गत द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच जिल्हा मार्ग देखील आहेत. पावसामुळे या रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. त्याबाबत मनसे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध आस्थापनांकडे निवेदन दिलेले आहे. संबंधित आस्थापनेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वीही मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलन करून सुद्धा रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण, साईडपट्ट्यांची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परंतु आता मनसे कोणताही निवेदन देणार नाही. चार दिवसाच्या खड्डे नाही बुजवले तर मनसे, मनसे स्टाईलने उत्तर देणार असल्याचा इशारा मनसेचे शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी दिला आहे.