महामार्ग पोलीस मदत केंद्राद्वारे रस्ता सुरक्षा सप्ताह

0
31

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

महामार्ग पोलीस मदत केंद्राद्वारे १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे. यानिमित्त मलकापूर येथील स्कुल ऑफ स्कॉलर्स महाविद्यालयात बुधवारी, १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाबद्दल मार्गदर्शन करुन सुरक्षेचे धडे देण्यात आले.

यावेळी मलकापूर महामार्ग पोलीस मदत केंद्र येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन केले. यामध्ये अठरा वर्ष वयोगटातील मुलांनी मोटार सायकल चालवू नये, विना लायसन्स व विना हेल्मेट मोटर सायकल वाहन चालवू नये, ओवर स्पीड व ट्रिपल सीट मोटार सायकल चालवू नये. तसेच रस्त्याने चालताना नेहमी डाव्या बाजूने चालावे, रस्ता ओलांडतांना पूर्ण खात्री करूनच रस्ता ओलांडावे व इतर वाहतूक नियमाबद्दल नियम समजावून सांगितले.

यावेळी महामार्ग पोलीस अंमलदार रमेश काळे, विठ्ठल काळुसे, दीपक पिटकर, अमोल हरमकर, गणेश उबाळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी स्कुल ऑफ स्कॉलर मलकापूरचे मुख्याध्यापक सुदीप्ता सरकार यांच्यासह इतर शिक्षकांनी सहकार्य करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here