Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद
    जळगाव

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    saimatBy saimatFebruary 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Road in Neri Naka area temporarily closed
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     सांडपाणी निचऱ्यासाठी मोरीचे काम हाती, वाहतुकीत बदल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शहरातील नेरी नाका परिसरात आजपासून तात्पुरते वाहतूक बदल लागू करण्यात आले असून महानगरपालिका हद्दीतील मुस्लिम स्मशानभूमी जवळील एसटी वर्कशॉप ते काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी, दिनांक ६ फेब्रुवारीपासून हा मार्ग बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    एसटी वर्कशॉप परिसरात पावसाळ्यात तसेच दैनंदिन सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रस्तावित रस्ता बांधकामापूर्वी सांडपाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी मोरी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या प्रक्रियेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खोदकाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहनांची दळणवळण तात्पुरती थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    या संदर्भात शहर अभियंता योगेश बोरोले यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले की, सांडपाणी निचऱ्यासाठी उभारण्यात येणारी ही मोरी भविष्यातील रस्त्याच्या टिकाऊपणासाठी अत्यंत आवश्यक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व सोयीस्कर रस्ता उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    दरम्यान, रस्ता बंद राहण्याच्या कालावधीत शाळकरी विद्यार्थी, स्थानिक रहिवासी तसेच एसटी वर्कशॉपकडे जाणाऱ्या वाहनचालकांना काही प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेच्या वतीने पर्यायी मार्गांची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.