साईमत मुंबई प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री आणि ३० आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली नाही. या मुळे अनेक चर्चना उधाण आले होते .पवार यांची भूमिका काय? ते यु टर्न घेणार का ? यावर तर्क लावले जात असताना मात्र आज राष्ट्रवादी ने 21 पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता खवले आहे .
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री मंत्री पदाची तर त्यांच्या राष्ट्रवादीच्या 9 जेष्ठ नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली .या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी चे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. या सर्वांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे.त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून व संघनेतील पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादीने काढलेल्या पत्रात म्हटलं आहे.
राष्ट्रवादीने पक्षातून निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये रत्नागिरीचे जिल्ह्याध्यक्ष बाबाजी जाधव, वसई-विरार जिल्ह्याध्यक्ष राजाराम मुळीक, तसेच पिंपरी चिंचवड शहाराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत कृष्णाराव शितळे, राहुल हनुमंत भोसले, जगदीश शंकर शेट्टी, तसेच लोकसभा दिंडोरीचे रविंद्र पगार यांच्यासह राष्ट्रवादीच्या २१ पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने घरचा रस्ता दाखवला आहे .