साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील तहसिलदारांना आपल्या शासकीय कार्यालयात व आपल्या अधिनिस्त सर्वच कार्यालयात गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा, अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीमार्फत देण्यात आले. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सागर निकम, मनोज(बाळाभाई) देशमुख, गौतम निकम, रवी गायकवाड, संदीप पगारे, किरण पगारे, सोनू डोखले आदी उपस्थित होते.