शहर व ग्रामीण काँग्रेसतर्फे क्रांती व आदिवासी दिन साजरा

0
33

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी

९ ऑगस्ट क्रांती दिन तसेच जागतिक आदिवासी दिनाचे स्मरण म्हणून जळगाव शहर व ग्रामीण कॉंग्रेसकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम कॉंग्रेस भवन येथे राष्टपिता महात्मा गांधीजीच्या प्रतिमेला शहरजिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.नंतर भाऊंचे उद्यान येथे भारतीय स्वतंत्रतासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच आदिवासी बाधवाना भेटून त्यांच्याशी हितगुज साधून त्यांचा सन्मान करण्यात आला.

सदर प्रसंगी ग्रामीणचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, शहर सरचिटणीस प्रदीप सोनवणे,जगदीश गाढे,श्रीधर बापू चौधरी, जाकीर बागवान, मीराताई सोनवणे, देवाभाऊ ठाकरे, सेल अध्यक्ष सखाराम मोरे,बबलू शेख, राजु पाटील,प्रवीण पाटील सर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here