मंडळाधिकारी बबीता चौधरी यांची माहिती
साईमत/यावल/प्रतिनिधी :
तालुक्यात महसूल पंधरवाडा म्हणजे १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट २०२४ पर्यंत महसूल विभागातर्फे शासनाच्या विविध प्रकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून बामणोद मंडळ स्तरावर विभागातर्फे बामणोद येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यात शासनाच्या विविध प्रकारच्या योजना त्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ वृद्धासाठी चारधाम यात्रा, दाखले वाटप, पिक विमा योजना आदी योजनांची माहिती मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांनी सविस्तरपणे दिली. तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या शंकाचे, समस्यांचे निरसन करून लोकाभिमुख विविध कामांना नियमित वेळेवर प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले.
यावेळी सरपंच गिरीश विलास तायडे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे, ग्रामविकास अधिकारी डी.डी.पाटील, मंडळ विभागातील तलाठी विजय शिरसाट, शैलेश झोटे, सुनिता देशभ्रतार उपस्थित होते.यावेळी डॉ.नरेंद्र कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करुन शासनाच्या उपक्रमाचे स्वागत केले.
आयटीआयच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चासत्र
उपक्रमाचा भाग म्हणून आजच ‘मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत बामणोद येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत युवा जागृतीसाठी आयटीआयचे विद्यार्थी यांच्या समवेत चर्चासत्र घेण्यात आले.यावेळी अध्यक्ष नरेंद्र कोल्हे, चेअरमन जे.डी. भंगाळे, मुख्याध्यापक जे.एम नवे, गणेश जावळे उपस्थित होते.