निंभोरा येथील पोष्टमन मनोहर ठाकरे यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
साईमत/निंभोरा,ता.रावेर/प्रतिनिधी :
सेवानिवृत्ती म्हणजे जीवनाचा अंत नसून कामाच्या व्यापामुळे आपल्याला जे करायला मिळाले नाही ते करण्याची संधी असल्याने आपल्या आवडीची पुस्तकांचे वाचन, आपले आवडते संगीत ऐकणे, पर्यटन, आपला छंद जोपासणे, अजून बरेच काही करण्याची संधी मानून आपले उर्वरित जीवन बहरदार ठरावे, अशा शुभेच्छा मनोहर ठाकरे यांना निंभोरा येथील माजी उपसरपंच व सरपंच संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे यांनी दिल्या.
निंभोरा गावातील अत्यंत सेवाभावी पोष्टमन म्हणून परिचित असलेले मनोहर लोटू ठाकरे हे तब्बल ४२ वर्षाची अखंडित सेवा देत नियत वयोमानानुसार वयाच्या पासष्टव्यावर्षी नुकतेच निंभोरा पोष्ट ऑफिसमधून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त मनोहर ठाकरे व उषा ठाकरे यांचा संयुक्तिक सत्कार करण्यात आला. सेवचे मूल्यमापन निवृत्तीच्या दिवशीच होत असते, यादिवशी मागे वळून पाहतांना अनाहुत झालेल्या चुकांपेक्षा केलेल्या चांगल्या कामांची यादी मोठी असल्याने जीवन कृतार्थ झाल्याचे समाधान मिळते, अशा विचारांसह अनेकांनी आपापल्या भावना येथील पोस्ट ऑफिसचे पोष्टमन मनोहर ठाकरे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केल्या.
निंभोरा पोष्ट कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोष्टाचे भुसावळ विभागीय व्यवस्थापक विनोद कासार होते. यावेळी किरण निंभोरा पोष्ट मास्तर किरण महाजन, रावेरचे पोष्ट मास्तर राहुल पाटील, दसनूरचे पोष्ट मास्तर चेतन सोनवणे, पातोंडीचे पोष्ट मास्तर भागवत पाटील, मेघ:शाम महाजन, फिरोज खान आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यांनी व्यक्त केल्या भावना
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व सरपंच संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे यांच्यासह भागवत ठाकरे, रावेर कृउबासचे माजी उपसभापती दुर्गादास पाटील, कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, सतिष पवार, संदीप जामोदे, डॉ.पंकज ठाकरे, नितीन भोगे, प्रशांत ठाकरे, विजय सोनार, शीतल जामोदे-ठाकरे, भिमराव गिरडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत मनोहर ठाकरे यांच्या सेवा व स्वभाव वैशिष्टगुणांना उजाळा दिला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला विकास सोसायटीचे चेअरमन मोहन बोंडे, हिरामण शिंदे, लक्ष्मण जामोदे, धनंजय ठाकरे, रमेश पवार, बापू मांडोळे, पंचायत समितीचे माजी सभापती हरलाल कोळी, ग्रामपंचायत सदस्य संगीता धनराज राणे, नामदेव ठाकरे, डॉ.जयेश वाणी, शाम बिडकर, विजय माळी, प्रकाश पाटील, मनोहर कन्हेय्यालाल वाणी, सचिन कडू चौधरी, शिवाजी गिरडे, रवींद्र बारी, अनिल बऱ्हाटे, नामदेव नेमाडे, प्रमोद बऱ्हाटे, चेतन पाटील, दिलीप मोरे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य दिलशाद शेख तर आभार सुभाष ठाकरे यांनी मानले.