Retired Veterinary Officer : सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ खोडके यांचा सत्कार

0
4

जामनेरचे ‘अमृतयात्री’ डी.डी.पाटील यांनी केला गौरव

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ कौतिकराव खोडके हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. याबद्दल ‘अमृतयात्री’ डी.डी.पाटील यांनी त्यांच्या सेवा कार्याची दखल घेत त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करुन गौरव केला.

डॉ.खोडके हे जामनेर तालुक्यातील भराडी येथील रहिवासी आहेत. ते पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून ७ जुलै १९८८ पासून कार्यरत झाले होते. त्यांनी कापूसवाडी, लोहारा, गोंडखेल, जामठी, वाकोद अशा विविध ठिकाणी सेवा दिली. शासकीय सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची दखल घेत डी.डी.पाटील त्यांचा सन्मान करतात. डॉ.खोडके हे प्रामाणिकपणे सेवा देणारे अधिकारी म्हणून परिचित होते. त्याबद्दल त्यांचा साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डी.डी.पाटील यांनी सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here