Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : शेअर ट्रेडिंगच्या फसवणुकीत निवृत्त व्यक्तीला १ कोटी ३५ लाखांचा गंडा
    क्राईम

    Jalgaon : शेअर ट्रेडिंगच्या फसवणुकीत निवृत्त व्यक्तीला १ कोटी ३५ लाखांचा गंडा

    saimatBy saimatJanuary 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Retired man cheated of Rs 1 crore 35 lakh in share trading scam
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    साईमत/ जळगाव/प्रतिनिधी –:

    शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळेल, असा आमिष दाखवून एका ६१ वर्षीय निवृत्त व्यक्तीची तब्बल १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादी कमलाकर धोंडू चौधरी (वय ६१, रा. तिवारी नगर, महाबळ रोड, जळगाव) हे सेवानिवृत्त आहेत. ३१ ऑगस्ट २०२५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना ‘Astha Trade 833 Education Community’ नावाच्या ग्रुपमध्ये ॲड केले. या ग्रुपद्वारे ‘ACSTRADE’ नावाचे ऑनलाइन शेअर ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगितले गेले.

    अ‍ॅप आणि ग्रुपद्वारे फिर्यादीला ५० टक्के नफा मिळवून दिला जाईल, असे खोटे आश्वासन देऊन आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. तथापि, जेव्हा कमलाकर चौधरी यांनी आपली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी विविध बँक खात्यांवर वेगवेगळ्या नावाखाली कर भरण्याचे कारण देत तब्बल १,३५,८५,१८९ रुपये घेतले, मात्र कोणतीही रक्कम परत दिली नाही.

    फिर्यादींच्या तक्रारीनुसार, आरोपींमध्ये कुणाल कुमार, नेहा बन्सल आणि आरव गुप्ता यांचा समावेश असून ते मोबाईल नंबरवरून संपर्क साधत होते. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.

    सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही ऑनलाइन गुंतवणुकीपूर्वी अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Jalgaon : महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीने कारवाईसाठी निवेदन

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.