साईमत जळगाव प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उर्वरित जिल्हा १४,१७,१९वर्ष मुले व मुलीच्या आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेमध्ये डोणगाव, धानोरा, अमळनेर, कुरवेल येथील संघानी अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथमच विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
धानोरा येथील झि. तो. म. माध्यमिक विद्यालयाने १७ वर्षे मुले, १४,१९ वर्षे मुलींच्या गटात यश संपादित केले आहे. इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल डोणगाव येथील शाळेने १४ वर्षे वयोगटात अटीतटीच्या अतिंम सामन्यात बारी समाज माध्यमिक विद्यालयावर विजय मिळविला व विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली . १९ वर्षे मुलांच्या गटात प्रताप कनिष्ठ महाविद्यालय अमळनेर व सतरा वर्षे मुलींच्या गटात कुरवेल हायस्कूल कुरवेल येथील संघानी अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथमच विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक एच बी धांडे व क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, जगदीश चौधरी, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. प्रदीप तळवेलकर, किशोर चौधरी, विशाल फिरके, विजय न्हावी, अनिल माकडे ,के. पी. बडगुजर, जे.डी. मोरे उपस्थित होते.