Khubchand Sagarmal Vidyalaya : खुबचंद सागरमल विद्यालयात पालखीसह वृक्षदिंडीला प्रतिसाद

0
5

लेझीम पथकासह पर्यावरण विषयक घोषणांनी परिसर दणाणला

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखीसह वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक विलास सांगोरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. लेझीम पथकासह पर्यावरण विषयक घोषणांनी परिसर दणाणला होता. तसेच सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दिंडीच्या समोरापानंतर सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष सांगोरे, संचालक भूषण सांगोरे, मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक निखिल जोगी, पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख अजय पाटील, पंकज सूर्यवंशी, लक्ष्मीकांत महाजन, प्रवीण पाटील , योगेंद्र पवार, अमृत पाटील, सुनील पाटील, संतोष चौधरी, राहुल देशमुख, सुनील साळवे, विजय पवार, भास्कर कोळी, मंगला सपकाळे, कल्पना देवरे, उज्ज्वला गोहिल, करुणा महाले, सुनिता येवले, सुनिता साळुंखे, लिखिता सोनवणे, माया खैरनार, सोनल मोरे, निलेश देसले, चेतन शिरसाट यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here