डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटलचा उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये तीन दिवसीय बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन कार्यशाळेला प्रतिसाद मिळाल्यामुळे उत्साहात पार पडली. कार्यशाळेत वैद्यकीय महाविद्यालयातील ३० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, डॉ.चित्रा नेतारे, एनएमसीचे निरीक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ.एन एस. आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. सुहास बोरोले, डी.एम.कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. अनंत बेंडाळे, डॉ सी.डी सारंग, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ.कैलाश वाघ, डॉ. शुभांगी घुले, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. बापुराव बिटे, डॉ. मिलींद जोशी, डॉ. मयूर मुठे, डॉ. माया आर्विकर आदी मान्यवर उपस्थित होते.
समारोपप्रसंगी व्याख्याना अगोदरची तयारी कशी करावी, अंतर्गत मुल्यांकन व सामूहिक मुल्यांकनाचे महत्व विषद करणे आदींवर तीन दिवसीय कार्यशाळेतून मंथन करून वैद्यकीय क्षेत्रातील नवीन शिक्षण पध्दतीचे अवलोकन करण्यात आले. कार्यशाळेत शिक्षकांनी सामूहिकरित्या कार्यशाळेला प्रतिसाद दिला.
हा उपक्रम नॅशनल मेडिकल कमिशनच्या मान्यतेने तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नोडल सेंटर व राष्ट्रीय आरोग्य परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. यशस्वीतेसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. अनंत बेंडाळे, प्राध्यापक व विद्यार्थी समितीने परिश्रम घेतले.सुत्रसंचालन अंतरवासिय विद्यार्थ्यांनी तर आभार डॉ. कैलास वाघ यांनी मानले.