Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»पहुरला मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराला प्रतिसाद
    जामनेर

    पहुरला मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराला प्रतिसाद

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिबिरात २५० बॅगांचे रक्त संकलन, ३५ महिलांनी नोंदविला विशेष सहभाग

    साईमत।जामनेर।प्रतिनिधी।

    तालुक्यातील पहुरला प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम समाजबांधवांतर्फे डॉ.नजमोद्दीन तडवी यांच्या नवोदय रुग्णालयात घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला. प्रथमच पहुरला एवढ्या मोठया संख्येने महिलांसह २५० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. त्यात ३५ महिलांनीही सहभाग नोंदविला. शिबिराचे उदघाट्न जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जळगाव येथील इकरा महाविद्यालयाचे चेअरमन हाजी अब्दुल मजीद जकरिया होते.

    शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. सलीम खान, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिक्षक धनंजय येरुळे, पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, ॲड. संजय पाटील, पहूर पेठचे सरपंच अब्बू तडवी, उपसरपंच शरद पांढरे, माजी उपसरपंच शाम सावळे, रवी मोरे, राजू पाटील, योगेश भडांगे, शंकर जाधव, महेश पाटील, समाधान पाटील, इका पहेलवान, अर्जुन लहासे, ललित लोढा, सलीम मौला, मिनाज शेख, मुन्ना पठाण, मौलाना मुजाहीद यांच्यासह हिंदू-मुस्लिम मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रेषित मोहम्मद पैगंम्बर यांच्या जीवन चरित्र्यावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

    यांनी घेतले परिश्रम

    शिबिरात जळगाव येथील रेड प्लस रक्तपेढीचे डॉ.सय्यद अली, अमोल शेलार, वीरेंद्र बिऱ्हाडे, पंकज गायकवाड, शाहिद शेख, अमोल पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त पिशव्याचे संकलन केले. यशस्वीतेसाठी डॉ.मोईनोद्दीन शेख, शरीफ शेख, शाहरुख खान, अल्ताफ खान, साबीर पिंजारी, जाकीर साबीर, शाहरुख तडवी, डॉ.जलाल शेख, डॉ.बोरसे, मोईद्दीन, बिस्मिल्लाह पिंजारी, तोफीक तडवी, शेखचाँद तडवी यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.