अथर्वशीर्षासह आवर्तनाचे होणाऱ्या फायद्यावर सेवेकऱ्यांकडून मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण करण्यात आले. “त्वमेव केवलं कर्तासि” असे म्हणत अहंकाराची ज्योत विझविणाऱ्या मन व बुद्धीला शांत ठेवणाऱ्या अथर्वशीर्षाचे पठण चैतन्यमय, भक्तीमय वातावरणात झाले. गणेशोत्सवाचे औचित्य साधून मनाला प्रसन्न करणारे अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले.
सर्वव्यापी गणेशाला मनोभावे वंदन करून सुबुद्धी, विवेक व सुयशाचे मागणे मागून अथर्वशीर्षाच्या पठणाला सुरुवात केली. तत्पूर्वी वैष्णवी नालकोल, सोनल राठोड यांनी गणपती अथर्वशीर्ष, त्याच्या आवर्तनाचे होणारे फायदे, याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.