साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
येथील मोहनराव नारायणा नेत्रालय, नांदुरा-शाखा मलकापूर तसेच व्हिजन सेंटर आणि ओम शांती ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २१ रोजी सरकारी दवाखान्याजवळ, मानस हॉस्पिटलसमोर ओम शांती व्हिजन सेंटर येथे मोफत नेत्र व हृदयरोग शिबिर आयोजित केले होते. शिबिराचा ८२ रुग्णांनी लाभ घेतला. अध्यक्षस्थानी डॉ.विजय डागा होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवाभावी संजय पाटील, सोमचंद दंड, हृदय रोग तज्ज्ञ डॉ. युसुफ खान, मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा येथील गजानन घोगरे, व्हिजन सेंटरचे ऑप्टोमेट्रीस्ट डॉ.ऋषिकेश लिंगोट उपस्थित होते.
सर्व प्रथम ओम शांती सेवा समिती आणि ओम शांती ऑप्टिकलचे संचालक सचिन भंसाली, रक्तदान कार्यात व विविध सामाजिक कार्यात अग्रेसर हनुमान सेनेचे अमोल टप, रवींद्र पाटील, देवजी दंड यांच्याकडून मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विजय डागा यांनी शिबिरामध्ये उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच हृदय रोग तज्ज्ञ डॉ. युसुफ खान यांनी हृदयरोगासंबंधी माहिती व उपचार याविषयी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी ओम शांती सेवा समिती, व्हिजन सेंटर मलकापूर, हनुमान सेना मलकापूरचे अमोल टप यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
